*⚡कणकवली ता.१०-:* क्रास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष संदिप कदम यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या त्रैमासीक सभेत आरोग्य विभागाच्या अध्यक्षपदी शंकर जयराम कदम व महासचिवपदी दिपक वामन कांबळे व जिल्हा कोषाध्यक्षपदी संजय अजबराव कडू व उपाध्यक्षपदी संजय प्रभाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशान्वये मंत्रालयीन सचिव सुरेश तांबे, राज्य सरचिटणीस शिक्षक संघटना आकाश तांबे, महासचिव सिंधुदुर्ग किशोर कदम यांच्या उपस्थितीत आरोग्य संघटनेस अधिकृत मान्यता देण्यात आली . यावेळी कर्मचारी महासंघाचे कामगार वर्गाचे जीवनस्तर उंचावणे , हे कामगार संघटनेचे मुख्य उद्दष्ट असून त्याचप्रमाणे कामगार वर्गावर होणारे अन्यायास वाचा फोडणे व कर्मचारी वर्गात स्वातंत्र्य , समता , बंधुभाव प्रस्तापित करणे , अशा विविध कामगार वर्गाचे प्राथमिक अधिकार कर्तव्य , ध्येय , उद्दिष्ट समोर ठेवून संघटना यापुढे कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष व महासचिव यांनी सर्वासमोर ठेवून कामगार हित डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे आपल्या निवेदनात जाहीर केले. यावेळी कर्मचारी आरक्षण पदोन्नती , बिंदू नामावली , कोव्हीड काळात काम करणाऱ्या कर्मचान्यांना आरोग्य विमा , प्रत्येक कर्मचान्याचा ” करोनायोध्दा ” सन्मान , कोव्होड कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन वेतनवाढ देण्यात याव्यात .
कर्मचारी यांचे सेवा सलग १०,२०,३० साल प्रश्न , मृत कोळीड कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा . मृत कर्मचारी त्यांचे पाल्यांना अनुकंपा नियुक्ती कर्मचारी पगार वेळेवर होणे , कर्मचान्यावर अन्याय अत्याचार होत असल्यास आरो विभागातील आरोग्य संघका सविका , आरोग्य सहाय्यक सहाय्यीका विस्तार अधिकार, एनआरएचएम कर्मचारी वर्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शंकर कदम ( अध्यक्ष ) – ९ ४०४३५२१५ ९ , महासचिव दिपक कांबळे – ९ ४२३८१८४६३ , कोषाध्यक्ष संजय कडू – ९ ४२३८७७७७५ जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव ७३५० ९ ३५२७२ यांचेशी संपर्क साधावा . कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविणेकरिता प्रसंगी आंदोलने , उपोषण , धरणे , कर्मचारी सहाय्य करून प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचे संघटनेचे ध्येय असल्याचे अध्यक्ष महासचिव यांनी सदरची निवड झाल्याने कर्मचारी वर्गातून व जिल्हाभरातून सदर कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात येत आहे .
