Headlines

विज्ञान प्रदर्शनात चेंदवण हायस्कूलची बाजी

तीन प्रथम क्रमांकांवर मोहोर

कुडाळ : बिबवणे येथे २६ व २७ नोव्हेंबर रोजी आयोजित कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये तीन प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाने आपला नावलौकिक उंचावला.
माध्यमिक गटातील शिक्षक प्रतिकृती स्पर्धेत विज्ञान शिक्षिका उर्मिला उमेश गवस यांनी सादर केलेल्या ‘स्त्री प्रजनन संस्था’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. वक्तृत्व स्पर्धेच्या लहान गटात कु. साध्वी संदीप चेंदवणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दिव्यांग प्रतिकृती स्पर्धेच्या माध्यमिक गटात कु. वैष्णवी म्हाकले हिने सादर केलेल्या ‘कार्बन ॲब्सॉर्बर’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षिका उर्मिला गवस यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबईचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थिनींसह मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page