चराठे ग्रामपंचायत हद्दीत रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी लाखोंचा निधी: ग्रामस्थांमध्ये समाधान…

⚡सावंतवाडी ता.२९-: चराठे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, पंचायत समिती सदस्य सौ. उत्कर्षा गावकर, चराठे सरपंच सौ. प्रचिती कुबल, उपसरपंच गोविंद परब युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, देवस्थान अध्यक्ष बाळू परब, माजी सरपंच रघुनाथ वाळके, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी बिर्जे, गौरी गावडे, प्रथमेश परब, नारायण जाधव, गावप्रमुख राजाराम परब, अँथोनी डिसोजा, संतोष खरात, आयुष कुबल, सौरव कुबल, रोहित कुबल, प्रणिकेत मेस्त्री, अथर्व मेस्त्री, अथर्व परब, प्रशांत बिर्जे, गौरवी कवडेकर, अनन्या भुजंग गावकर, महेश नाईक, आयुष म्हापणकर, अमन कोनारे, शिवसेना उपविभागप्रमुख राजू कुबल, संजय माजगावकर भाई माजगावकर,आदी उपस्थित होते.
यामध्ये चराठा गावडे शेतरस्ता ते सावंतवाडी नगरपालिका हद्दीपासून श्री. रवी कृष्णापा नायर यांच्या जमिनीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच चराठे वझरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २७४ मुख्य रस्ता ते स. नं. १८१/ई, प्लॉट क्रमांक १४ पर्यंतच्या रस्त्यासाठी ८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
चराठे उभा गुंडा येथील अब्दुल रझाक गुड्डू शहा कितूर यांच्या जमिनीपासून श्री. दीपक अंकुश दाभोळकर यांच्या जमिनीपर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लाख रुपये, तर चराठे नमसवाडी काळसेकर टेंब ग्रा.मा. २७१ रस्त्यापासून लुसिन फर्नांडिस यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा एकूण २८ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
या विकासकामांमुळे चराठे गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून गावातील विकासकामांना निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
