Headlines

खुटवळच्या विश्वजित मेस्त्रीला ‘नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार पुरस्कार २०२६’ प्रदान…

अनुपम खेर आणि काजल अग्रवाल यांच्या हस्ते गौरव; गोव्याच्या कलाक्षेत्रात मानाचा तुरा..

⚡बांदा ता.२९-: गोव्यातील पेडणे तालुक्यातील खुटवळ येथील युवा कलाकार विश्वजित विश्वास मेस्त्री याला चित्रपट आणि कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बालगंधर्व रायझिंग स्टार पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
ITSF प्रस्तुत बालगंधर्व पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दत्तात्रय माने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात हिंदी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अभिनेते अजिंक्य देव, अनुपम खेर, अभिनेत्री काजल अग्रवाल, गायक नंदेश उमप, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि नचिकेत लेले यांचा समावेश होता.
नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रतिष्ठित सोहळ्यात विश्वजित मेस्त्री याला रायझिंग स्टार पुरस्काराने गौरविण्यात आल्याने खुटवळसह पेडणे परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे. युवा कलाकार म्हणून मिळालेला हा सन्मान त्याच्या कलाक्षेत्रातील वाटचालीला नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. गोव्यातील संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेले विश्वास मेस्त्री यांच्या कलागुणांचा वारसा विश्वजित समर्थपणे पुढे नेत आहेत.

You cannot copy content of this page