Headlines

वेंगुर्ल्यात ७ डिसेंबर रोजी मच्छिमार बांधवांसाठी जनजागृती कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.२९-: कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग, लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन वेंगुर्ला व अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमार बांधवांसाठी राष्ट्रीय मत्स्य पालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी वेंगुर्ला शहरातील राजवाडा येथील किरण कुबल यांच्या निवासस्थानी सकाळी ९.३० वाजता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मच्छिमार बांधवांची नोंदणी करण्यात येणार आहे. मच्छिमार बांधवांनी सोबत येताना आपले आधार कार्ड, आधार कार्डला संलग्न असणारा मोबाईल, बँक पासबुक, तसेच स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन उपस्थित राहावे. राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणाऱ्या मच्छिमार बांधवांना यापुढे स्वतंत्र डिजिटल ओळख मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना आणि इतर मत्स्य व्यवसाय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी उपयुक्त ठरणार आहे. तसेच मत्स्यपालन विमा प्रोत्साहन व संस्थात्मक कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. या कार्यक्रमात मच्छिमारांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्म वर नोंदणी करावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन वेंगुर्ला अध्यक्षा ज्योती देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page