Headlines

२ डिसेंबरला सावंतवाडी तालुका काँग्रेसची मासिक बैठक…

जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर राहणार उपस्थित; तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांची माहिती..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची मासिक बैठक बुधवार, दिनांक २ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तालुका काँग्रेस कार्यालय, उभा बाजार येथील जीवनरक्षा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच विविध सेलचे तालुकाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच व सदस्य यांनाही बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी निर्धारित वेळेत बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page