*⚡मालवण ता.१०-: सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मालवण केंद्रावर रोज सायंकाळी ६ वाजता या नाट्यप्रयोगांना सुरुवात होईल. रत्नागिरी केंद्रावर आठ संघ सहभागी झाले असून या केंद्रावरील स्पर्धेला १५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाचे नियम पाळून ही स्पर्धा होणार आहे.
यामध्ये दि. २५ जानेवारी रोजी अक्षरसिंधु साहित्य कलामंच, सिंधुदुर्ग- कणकवली यांचे ‘कायापालट’ लेखक : संभाजी सावंत, दिग्दर्शन: सुहास वरुणकर. २६ रोजी बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांचे ‘गांधी विरुद्ध सावरकर, लेखक: पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शन : केदार सामंत २७ रोजी जीवनदायी विकास संस्था, वेंगुर्ले उभादांडा यांचे ‘बोगनवेल,’ लेखक व दिग्दर्शक : प्रसाद खानोलकर. २८ रोजी क्षितीज इव्हेंट, सावंतवाडी यांचे ‘तुका अभंग अभंग,’ लेखक : विष्णू वाघ, दिग्दर्शक : प्रवीण मांजरेकर. २९ रोजी माझा वेंगुर्ले (ता. वेंगुर्ले) यांचे ‘लोककथा-७८, लेखक : कै. रत्नाकर मतकरी, दिग्दर्शन : प्रकाश हळदणकर. ३० रोजी नागरिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान, नेरुर वाघचौडी (ता. कुडाळ) यांचे ‘चांडाळ चौकडी, लेखक : भास्कर गावडे, दिग्दर्शक : देवेंद्र गावडे. ३१ रोजी साईकला कला क्रीडा मंच, पिंगुळी यांचे ‘बाकी शून्य,’ लेखक व दिग्दर्शक केदार देसाई. १ फेब्रुवारी रोजी श्री ज्ञानेश्वर कला संस्कृती क्रीडा मंडळ, नेरुर सायचे टेंब (ता. कुडाळ) यांचे दिसता तसा नसता रे’ लेखक व दिग्दर्शक : साईनाथ नेरुरकर. २ रोजी सिद्धांत फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांचे ‘महाशून्य,’ लेखक : राजेंद्र पोळ दिग्दर्शक: स्वानंद सामंत ३ रोजी स्वराध्या फाऊंडेशन, मालवण यांचे ‘दिल धक धक करे’ लेखक व दिग्दर्शक : प्रदीप कबरे, आदी नाटके सादर होणार आहेत.
