ओमीक्रोनच्या पाश्वभूमीवरील नवीन नियमावली नागरिकांनी पाळावी

शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नये;मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

*⚡सावंतवाडी ता.१०-: राज्यात ओमिक्रॉन या कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा वेग वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे या नियमांचे सर्व नागरिकांनी पालन करून शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून नगरपरिषदेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यअधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.

राज्यात ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे यामुळे कोरोनाचा आता संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे तसेच सर्वांनी मास्क, सोशल डिस्टसींग, सॅनिटायझर चा वापर करावा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. शहरातील ज्या व्यक्तिंचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण अपूर्ण आहे त्यांनी लसीकरण करुन घ्यावे तसेच शहरात पुन्हा लॉगडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नगरपरिषद संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले

You cannot copy content of this page