उपाध्यक्षपदी बबन पवार, सचिव संदीप पारकर यांची नियुक्ती
*⚡कणकवली ता.१०-:फोंडाघाट व्यापारी संघाच्या कार्यकारिणीची निवड नुकत्याच पार पडलेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी यशवंत मसुरकर, सचिवपदी संदीप पारकर, खजिनदारपदी गणेश कोरगावकर तर उपाध्यक्षपदी बबन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नवोदित कार्यकारिणीला सर्व व्यापारी, व्यवसायिक, भाजी विक्रेते यांनी खंबीर उभे राहुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. नवीन कार्यकारिणीत पुढील विविध समस्या वर यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये लायसन्स. दाखले, नूतनीकरण, बाजारपेठेतील ट्राफिक, परप्रांतीयांचा पेठेतील व्यवसायात चंचुप्रवेश,व त्यावर प्रतिबंध, खराब झालेल्या घाट रस्त्याचे नूतनीकरण, व्यवसायातील चढाओढ, सामंजस्य, मार्गदर्शक- शिबिरे इत्यादीचा समावेश होता. यावर लवकरच ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी कार्यरत राहणाऱ्या जम्बो कार्यकारिणी सदस्यांची निवड पुढील प्रमाणे : – रमेश भोगटे, दिनेश नारकर, संतोष पावसकर, राजेंद्र पावसकर, सत्यवान पारकर, सुरेश टक्के, प्रथनेश रेवडेकर, प्रदीप तावडे,विलास सावंत, राजेंद्र कुबडे, समीर मांगले, संजय माळवदे, संतोष पारकर, प्रमोद गव्हाणकर,सचिन भोगले, दया भोगटे, रामा मसुरकर, हर्शल तेंडुलकर, व्यंकटेश लाड, सुखदेव पवार, निलेश सापळे, प्रकाश सापळे, गजानन काळगे, राजेश पारकर, आप्पा मोदी, प्रसाद हळदीवे इत्यादी तसेच काम करण्याची इच्छा असलेल्या व्यापारी बांधवांचे स्वागत करण्याचेही ठरले.शेवटी कुमार नाडकर्णी यांनी आभार मानले
