Headlines

शाळा बंद न करता शाळा सुरू ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी…

शिक्षण सहाय्यक संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण नाईक यांची तहसीलदारांनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.११-: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पहिली ते आठवी च्या शाळा बंद करण्यात आल्या असून, त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. गेली दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळा बंद न करता त्यावर शासनाने…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत विणा, कृपा व निल प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.११-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध महोत्सवांतर्गत युवक दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विणा गावडे, कृपा म्हाडदळकर व निल बांदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे उद्घाटन जैतिराश्रित संस्थेचे कार्यवाह बन्सी चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जैतिराश्रीत संस्थेचे उपाध्यक्ष विष्णु परब, वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर,…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

*⚡सावंतवाडी ता.११-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत केंद्रशाळा बांदा नंबर एक मधील, इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने पहिली ते सातवी या शालेय गटातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. यासाठी त्याला त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर, केंद्र शाळा बांदा मधील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका सरोज…

Read More

सावंतवाडी जिल्हा कारागृहातील तीन कैदी कोरोना पॉझिटिव्ह…

कारागृहात खळबळ *⚡सावंतवाडी ता.११-:* येथील जिल्हा कारागृहातील तीन कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कारागृह प्रशासन हादरले असून, पुन्हा एकदा कोरोनाने कारागृहात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सबंधित कैद्यांना सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असल्याने त्याची आर.टी.पी.सी. आर टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये ते पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा कारागृह प्रशासनाने त्याची कल्पना उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ उत्तम पाटील…

Read More

तेरवण मेढे येथील बी एस एन एल टॉवर गेले 15 दिवस बंद…

दोन दिवसात कार्यान्वित न झाल्यास कार्यालयाला घेराव घालणार; युवासेना कार्यकर्ते संदेश राणे यांचा इशारा दोडामार्ग ता.११सुमित दळवी-: भारत संचार निगम लिमिटेड यांचा भोंगळ कारभार हा नेहमीच चव्हाट्यावर असतो. तेरवण मेढे येथील बीएसएनल मोबाईल टॉवर गेले पंधरा दिवस बंद असून त्याकडे संबधीत अधिकारी व खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तिलारी परिसरात विशेषतः मेढे, हेवाळे, मुळस, घाटीवडे,…

Read More

भाजपा जिल्हा कार्यकारिणी उद्या बैठक

केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे मार्गदर्शन करणार *⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवार 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता महिला भवन ओसरगाव कणकवली येथे संपन्न होत आहे.या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/आघाडी जिल्हाअध्यक्ष,जिल्हा…

Read More

मडुऱ्यात रेल्वेच्या धडकेत सांबर ठार

*⚡बांदा ता.११-:* कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा-केरकरवाडी येथे रेल्वेच्या धडकेत शिंगाडा (सांबर) ठार झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. थोड्याच वेळात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होणार आहेत. याबाबतची माहिती मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे यांनी…

Read More

विश्वनाथ नाईक यांना जिल्हा प्रेस क्लबचा ग्रामीण विभाग पुरस्कार जाहीर

शहरी विभाग पुरस्कार जय भोसले यांना तर दिव्या वायंगणकर यांना कै.संदीप सावंत स्मृती पुरस्कार व प्रकाश वालावलकर यांना शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर *⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २०२२ ला सकाळी १०.३० वाजता माडखोल येथील सावंत फार्मवर होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

वाभवे वैभववाडी नगरपंचायत मध्ये एका उमेदवाराची माघार…

*⚡वैभववाडी ता.१०-:* वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या चार जागांसाठी 10 जण रिंगणात राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवसांपर्यंत केवळ एकच अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे चार जागांसाठी 10 जण निवडणूक लढवणार आहेत. छाननीत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांचे उमेदवारी अवैध झाल्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतीच्या 17…

Read More

तळेरे कार मोटरसायकल अपघातात वृद्ध ठार

*⚡कणकवली ता.१०-:* मुबंई गोवा महामार्गावर कार आणि मोटरसायकल यांच्या अपघातात मोटरसायकलवरील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकल चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महामार्ग उड्डाणपुलनजीक तळेरे येथे घडली. गीतेश गुणाजी जाधव ( रा.कोंडये, ता.राजापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गीतेश आपले वडील गुणाजी भिवा जाधव ( वय ७० ) यांच्यावर कणकवली येथे…

Read More
You cannot copy content of this page