वाभवे वैभववाडी नगरपंचायत मध्ये एका उमेदवाराची माघार…

*⚡वैभववाडी ता.१०-:* वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या चार जागांसाठी 10 जण रिंगणात राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवसांपर्यंत केवळ एकच अर्ज मागे घेण्यात आला.

त्यामुळे चार जागांसाठी 10 जण निवडणूक लढवणार आहेत. छाननीत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांचे उमेदवारी अवैध झाल्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत होणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 4 प्रभागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयानुसार 18 जानेवारीला या चार जागांसाठी मतदान होणार आहे. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3, 5, 15, 16 साठी ही निवडणूक होत आहे.

यामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपाकडुन रेवा रामचंद्र बावदाणे, तर शिवसेनेकडुन सोनल संतोष मांजरेकर, प्रभाग पाच मध्ये भाजपाकडुन संगीता बंजरंग चव्हाण तर शिवसेनेकडुन सुनिता रवींद्र चव्हाण प्रभाग पंधरा मध्ये भाजपाकडुन विलास श्रीपती मांजरेकर, शिवसेनेकडुन वैभव श्रीधर सावंत आणि अपक्ष उमेदवार सुभाष अनाजी रावराणे हे निवडणुक लढवित आहेत. प्रभाग सोळा मध्ये भाजपाकडुन कल्पेश रत्नाकर कदम, शिवसेनेकडुन रणजित हरिश्चंद्र तावडे आणि अपक्ष उमेदवार सागर रामचंद्र इंदप हे निवडणुक लढवित आहेत. प्रभाग तीन व पाच मध्ये दुरंगी लढत तर पंधरा व सोळामध्ये तिरंगी लढत होत आहे. शिवसेना व भाजपा या दोन पक्षामध्येच या लढती होणार आहे.

You cannot copy content of this page