शहरी विभाग पुरस्कार जय भोसले यांना तर दिव्या वायंगणकर यांना कै.संदीप सावंत स्मृती पुरस्कार व प्रकाश वालावलकर यांना शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर
*⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २०२२ ला सकाळी १०.३० वाजता माडखोल येथील सावंत फार्मवर होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रेसच्या वतीने प्रेस क्लब शहरी विभाग पुरस्कार बांदा येथील पत्रकार जय भोसले यांना तर ग्रामीण विभाग पुरस्कार पाडलोस येथील पत्रकार विश्वनाथ नाईक यांना जाहीर झाला आहे. सौ.दिव्या वायंगणकर यांना कै.संदीप सावंत स्मृती पुरस्कार तर सिंधुदुर्ग प्रेस क्लब पुरस्कार मडूरा येथील प्रसिद्ध शेतकरी बागायतदार प्रकाश वालावलकर यांना सिंधुदुर्ग प्रेस क्लब शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
