मडुऱ्यात रेल्वेच्या धडकेत सांबर ठार

*⚡बांदा ता.११-:* कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा-केरकरवाडी येथे रेल्वेच्या धडकेत शिंगाडा (सांबर) ठार झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.

याबाबतची माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. थोड्याच वेळात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होणार आहेत. याबाबतची माहिती मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे यांनी दिली.

You cannot copy content of this page