भाजपा जिल्हा कार्यकारिणी उद्या बैठक

केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे मार्गदर्शन करणार

*⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवार 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता महिला भवन ओसरगाव कणकवली येथे संपन्न होत आहे.या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/आघाडी जिल्हाअध्यक्ष,जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती,उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस अपेक्षित आहेत.तरी सर्व अपेक्षित पदाधिकारी, यांनी वेळेत बैठक स्थळी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page