कारागृहात खळबळ
*⚡सावंतवाडी ता.११-:* येथील जिल्हा कारागृहातील तीन कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कारागृह प्रशासन हादरले असून, पुन्हा एकदा कोरोनाने कारागृहात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सबंधित कैद्यांना सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असल्याने त्याची आर.टी.पी.सी. आर टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये ते पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा कारागृह प्रशासनाने त्याची कल्पना उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांना दिली आहे.
