वक्तृत्व स्पर्धेत विणा, कृपा व निल प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.११-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध महोत्सवांतर्गत युवक दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विणा गावडे, कृपा म्हाडदळकर व निल बांदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन जैतिराश्रित संस्थेचे कार्यवाह बन्सी चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जैतिराश्रीत संस्थेचे उपाध्यक्ष विष्णु परब, वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, मंगेश सावंत, ढोले पाटील सर, संजय पाटील, महेश राऊळ, नाना राऊळ, केशव सावंत आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – खुला गट (विषय-निर्भया आणि नंतर)-प्रथम विणा गावडे (मातोंड), द्वितीय-मंगल जोशी (सावंतवाडी), तृतीय-दिव्यता मसुरकर (वेंगुर्ला), उत्तेजनार्थ-कुणाल कानडे (माडखोल), निखिता गिरप (वेंगुर्ला), शालेय मोठा गट- (विषय-मला समजलेले अब्दुल कलाम)-प्रथम-कृपा म्हाडदळकर (उभादांडा स्कूल), द्वितीय-श्रद्धा नेमण (मातोंड स्कूल), तृतीय-पूर्वा चांदरकर, उत्तेतनार्थ-प्रणया राऊळ (दोन्ही नेमळे हायस्कूल), करण करंगुटकर (पाटकर हायस्कूल), शालेय लहान गट-(विषय-आई-वडील माझे दैवत)-प्रथम-निल बांदेकर (बांदा नं.१), द्वितीय-श्रावणी आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल), तृतीय-यज्ञेश शिदे (नेमळे हायस्कूल), उत्तेजनार्थ-हंसिका वजराठकर (वेंगुर्ला नं.४), यशराज नाईक (वेंगुर्ला) स्पर्धेचे परिक्षण अजित राऊळ, बी.टी. खडपकर, प्रा.वैभव खानोलकर, अॅड. चैतन्य दळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण राऊळ, सागर सावंत, बंटी सावंत, निखिल ढोले, वैष्णवी परुळकर, अक्षता गावडे, विनिता आंगचेकर, सायली माळकर, योजना नवार यांनी मेहनत घेतली. गुरुदास तिरोडकर यांनी सूत्रसंचालन तर रोहन राऊळ यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page