तृणधान्य पाककृती स्पर्धेत आदिती मेस्त्री प्रथम
⚡मालवण ता.२८-: प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियानांतर्गत पालक व ग्रामस्थ यांच्यासाठी मसुरे केंद्रस्तरीय आयोजित तृणधान्य पाककृती स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्या आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या मिक्स तृणधान्याचे आप्पे या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मसुरे केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला नाचणी, वरी, गहू, तांदूळ यासारख्या विविध धान्यांचा वापर करून…
