सावंतवाडी येथे २६ रोजी हे चांदणे फुलांनी कार्यक्रम…

श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, दीपक केसरकर मित्रमंडळ व नगरपरिषदेच्यावतीने आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२१- : श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित दीपक केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद प्रस्तुत ‘हे चांदणे फुलांनी’ हा हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा कार्यक्रम येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे रविवार २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना श्री. निलेश मेस्त्री यांची असून कार्यक्रमाचे यंदाचे हे ६ वे वर्ष आहे. यात कु वर्षा देवण, ॲड सिद्धी परब, कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर, कु केतकी सावंत, सौ अनामिका मेस्त्री, सौ पूजा दळवी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ, सौ मानसी वझे, कु अंकुश आजगावकर, कु स्मिता गावडे, कु चिन्मयी मेस्त्री, कु श्रिया म्हालटकर, कु तन्वी दळवी, कु आरोशी परब, कु आरोही परब, कु. विभव विचारे, कु .ऋतुजा परब, कु. मुग्धा पंतवालावलकर आदी कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना हार्मोनियम श्री निलेश मेस्त्री, तबला श्री किशोर सावंत, कु. निरज भोसले, कु सिद्धेश सावंत ढोलक /ढोलक, सिंथेसायझर कु. मंगेश मेस्त्री, कु पुरुषोत्तम केळुसकर, ऑक्टोपॅड श्री अश्विन (गुड्डू) जाधव आदी संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे व ध्वनी संयोजन श्री हेमंत मेस्त्री – पडेलकर करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page