Headlines

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनी वैभववाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

वैभववाडी प्रतिनिधी
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्सुकता प्रतिसाद मिळाला सामाजिक बांधिलकी जपत रक्तदात्यांनी सोइच्छेने रक्तदान करून शहीद मेजर कौस्तुभ रावराणे अनोखी मानवंदना अर्पण केली.
शहीद मेजर कौस्तुभ रावर आणि यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जि प सदस्य प्रमोद रावराणे भैरी भवानी प्रतिष्ठेचे अध्यक्ष अतुल रावराणे जयेंद्र रावराणे शरद रावराणे विजय रावराणे प्राचार्य के सी चव्हाण राजेश पडवळ संजय रावराणे आदी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी रावराणे मित्र मंडळ वैभववाडी आणि राजेश पडवळ जनसेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

You cannot copy content of this page