शाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून आहेत कार्यरत
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर शिराळे शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री स्वप्नील गुरखे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
गुरखे यांनी नोकरीची सुरुवात विद्यामंदिर फोंडासुतार वाडी शाळेतून केली. विद्यार्थी प्रिय, संगणक तज्ञ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख. त्यांचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर मजल. अशा अनेक उल्लेखनिय बाबी सरांनी केलेल्या आहेत. फोंडा सुतारवाडी, लोरे, नाधवडे ते आता शिराळे या ठिकाणी सेवा बजावत आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना यावर्षाचा महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले.त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
