धनगर समाजाच्या मागण्या मान्य करा…

नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन

वैभववाडी प्रतिनिधी
धनगर समाजाची एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा व इतर मागण्यांचे निवेदन नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका धनगर समाजाच्या वतीने वैभववाडी तहसीलदार यांना देण्यात आले.


धनगर समाजाचे‌ वतीने देण्यात आलेले निवेदन पुढील मागण्या केले आहेत. 1)धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा.2) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याची ॲड. कुंभकोनी यांची काय नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सोनावणे करिता अर्ज दाखल करणे.3) मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी मंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरच लवकर सहकार मंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षांची नेमणूक करणे.4) जे आदिवासींना ते धनगरांना याप्रमाणे घोषित केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या 22 योजनेंपैकी काही योजना प्रभावपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करणे.5) मेंढपाळावर होत असलेले हल्ले थांबवणे व त्यावर स्वातंत्र कायदा आणून संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई पूर्ण क्षेत्र वार्षिक प्रती हेक्टर एक रुपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.6) बिरोबा मंदिर देवस्थानाच्या पाच मुळे स्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आणि सुशोभीकरणासाठी दोनशे कोटी रुपये निधी द्यावा.7) महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले वाफगाव विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी.8) सद्यस्थितीत एनटीसी ३.५ टक्के नुसार रोस्टर घोटाळा दूर करून येणाऱ्या सर्व नोकर भरती मध्ये जागा उपलब्ध करून द्याव्यात.9) एसटी प्रमाणपत्र पुरावे पाहून तात्काळ वाटप करणे.10) एसटी पेसा भरती समावेश करणे बाबत.11) छत्रपती संभाजीनगर व धाराशिव ज्या धरती वरती नामांतर केले त्याच धर्तीवर ती अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश द्यावे. अशा एकूण 11 मागण्यांचे निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे निवेदन वैभववाडी तालुका तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार यांच्याकडे वैभववाडी सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचे युवा नवलराज विजयसिंह काळे निवेदनाचा आशय उपस्थित बांधवांना समजावून सांगत नायबतहसीलदार यांना निवेदन सुपूर्द केले.यावेळी गंगाराम इंजू शिंदे, दाजी विठ्ठल बर्गे, अनिल कोकरे, ॲड. विक्रमसिंह विजयसिंह काळे,विलास फाले, चंद्रकांत बोडेकर, गंगाराम बोडेकर, दिगंबर गुरखे, सुनिता रामचंद्र झोरे, आनंदी रामचंद्र शेळके, ईशा रामचंद्र झोरे, लक्ष्मण बोडेकर, अथर्व जंगले व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो वैभववाडी तालुका धनगर समाजाचे वतीने तहसीलदार यांना निवेदन देताना ‌छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page