वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या शीतल विष्णू घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज शुक्रवारी
सरपंच बाळा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय पोवार यांनी काम पाहिले. सरपंच बाळा मधुकर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, ग्रामपंचायत सदस्य राखी धुरी, प्राजक्ता जाधव, रती नाईक, नेत्रा राणे, भाजपचे पदाधिकारी आणि सोसायटी चेअरमन विश्वनाथ धुरी, सदानंद गावडे, सुजाता देसाई, संदिप देसाई, प्रकाश रेगे,नंदा गावडे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
आसोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्याशीतल घाडी यांची बिनविरोध निवड
