ओ पी नय्यर जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
कुडाळ : ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अजरामर संगीताचा रसिकांना नव्याने परिचय करून देण्यासाठी आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ओ. पी. संगीत रसास्वाद कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत चिं. त्र्यं. खानोलकर ललित कला केंद्र, कुडाळ येथे होणार आहे. या कार्यशाळेत संगीत अभ्यासक संदिप जोशी हे मुक्त संवादातून ओ. पी. नय्यर यांच्या संगीतशैलीतील वैशिष्ट्ये, गाण्यांमागील किस्से, चालींची रचना आणि त्यांच्या संगीताचा प्रभाव याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेसाठी ₹२०० देणगी शुल्क असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
https://forms.gle/UQTsMLcxqRwCF8of9 या लिंक वर देणगी शुल्क भरून गुगल अर्जाद्वारे नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संदिप जोशी (मो. ९८२०९१६००२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
