सगळे घेतलात तरी शरद पवारांनी लोकांच्या मनात केलेली जागा कोण काढून घेवू शकत नाही…

अमित सामंत :मुक आंदोलन करून निवडणूक आयोगाचा केला निषेध ⚡सावंतवाडी ता.०८-: भाजपने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून निवडणूक आयोगावर दबाव टाकून आमच्या पक्षाच नाव काढून घेतल. चिन्ह काढून घेतल .तरी पण लोकांच्या मनातील स्थान शरद पवारांनी मिळवलेले कोण काढू शकत नाही, असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भाजपवर केला आहे.दरम्यान शरद पवार ही…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०८-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई पुरस्कृत राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागासाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, परीक्षक म्हणून लाभलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक खोब्रागडे,…

Read More

भरधाव कारने पादचाऱ्याला ठोकरले, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू…

⚡कुडाळ ता.०८-:: मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ हुमरमळा येथे आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या बाजूने सकाळी जॉगिंगसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने ठोकरले. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी भरधाव चारचाकीवर चालकाचे नियंत्रण न राहिल्याने हा भीषण अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. कालिदास…

Read More

शाहिर नंदेश उमप यांच्या गायनाने सावंतवाडीकर रसिक तल्लीन..

लोकगीतांचा नजराणा : रसिकांवर गारुड.. ⚡सावंतवाडी ता.०७-: गण, गवळण, गोंधळ, भारुड, बतावणी आणि पोवाडा सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथेचे सादरीकरण या कार्यक्रमांनी सावंतवाडीकर रसिक तल्लीन झाले. निमित्त होते ते शाहीर नंदेश उमप यांच्या ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या कार्यक्रमाचे.सावंतवाडी येथील स्वार हॉस्पिटल समोरील मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित…

Read More

सावंतवाडी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी बासित पडवेकर…

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी बासित पडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे यावेळी त्यांना उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Read More

१० फेब्रुवारीला सिंधुदुर्गनगरीत व्यावसायिकांना मार्गदर्शन…

एम एस एम एस ई मंत्रालय आणि नॅस्कॉम यांचे आयोजन:केंद्रीयमंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय व नॅस्कॉमच्या सहकार्याने १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता शरद कृषी भवन ओरस येथे लहान व मध्यम उद्योग व्यवसायिकांसाठी एम.एस.एम.एस.ई सशक्तीकरण रणनीतीक टेक्नोलॉजी च्या मदतीने व्यवसाय वृद्धी, डिजिटल मार्केटिंग, एम.एस.एम.ई. साठी व्यवसाय…

Read More

काजू बी ला प्रती किलो २०० रुपये हमीभाव द्या…

कृषी उत्पन्न समितीची शासनाकडे मागणी. सिंधुदुर्गनगरी ता ७काजू बी ला प्रति किलो २०० रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. अशी मागणी शासनाकडे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी २०० रुपये प्रति किलो काजू दरासाठी शासनाकडे मागणी केली आहे व यासाठी आंदोलनही केले आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात काजू बी उत्पादन…

Read More

शिक्षक भरतीत डीएड बेरोजगारांना न्याय द्या…

राजन तेली: डीएड संघर्ष समितीसह सीईओ देशमुख यांची घेतली भेट. सिंधुदुर्गनगरी ता ७डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उमेदवारांना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन शिक्षक पदी नियुक्ती द्याव्यात. या मागणीसाठी आज माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज अध्यक्ष विजय…

Read More

नौसेना दिनानिमित्त मालवणात झालेल्या हेलिपॅड व शिवपुतळा सुशोभीकरण कामात मोठा घोटाळा…

परशुराम उपरकर:कामांच्या चौकशीसाठी १५ रोजी आंदोलन.. ⚡मालवण ता.०७-: मालवणात नौसेना दिननिमित्त झालेल्या हेलीपॅड व राजकोट येथील शिवपुतळा सुशोभीकरण कामात मोठा घोटाळा झाला आहे, या कामांची कागदपत्रे व प्रत्यक्ष झालेले काम यात मोठी तफावत आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केला. या कामांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली कार्यकारी अभियंता श्री….

Read More

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा…

सावंतवाडी : बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी कलामहाविद्यालयाचारौप्यमहोत्सवी सांगता समारंभ वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा करण्याचा मानस आहे.कलाशिक्षणाचा प्रसार आणि उपयोग जिल्ह्यात सर्वदूर पोहोचावा या उद्देशाने महाविद्यालयातर्फ़े दरवर्षी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे आयोजन आपापल्या प्रशालेमध्ये करावयाचे ठरवले आहे.ही स्पर्धा व तिचे गटानुसार विषय खालीलप्रमाणे –गट विषयअ) नर्सरी ज्यु ते इयत्ता ४ थी…

Read More
You cannot copy content of this page