ऐनारीतील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.२८-: ऐनारी-गुरववाडी येथील शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे उपविभागप्रमुख रुपेश गुरव यांनी आपल्या शिवसैनिकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे आमदार नीतेश राणे पक्षात स्वागत केले.
शिवसेना उबाठा पक्षाचे विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ, हर्षल सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपचे कमळ हाती घेतले. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रुपेश गुरव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला.
पक्षप्रवेशावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, देवानंद पालांडे यांच्या भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे शिवसेना पक्षाकडून कोणतीच विकासकामे होत नसल्याने नीतेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन. भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page