वैभववाडी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरीत जाहीर सभा घेत असतानाच वैभववाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेना मोठा धक्का बसला आहे.
युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल सरवटे, माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव, गटप्रमुख राहुल घाडी यांच्यासह वेंगसर गावातील शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रसाद गुरव, प्रशात घाडी, सिध्देश घाडी, शुभम शिंदे, संजय शिंदे, स्वप्निल दबडे, रुतिक घाडी, विजय घाडी, सुनिल पावसकर, गजानन पावसकर, रवींद्र पावसकर, विकास पावसकर, वसंत पावसकर, बाळकृष्ण पावसकर, सुभाष पावसकर, प्रशात पावसकर, शरद अनंत पावसकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पक्षप्रवेशावेळी शक्तीप्रमुख रामदास पावसकर, दिलीप बेळेकर, सरपंच सुगंधा मंचेकर समाधान गुरव, महेश रांबाडे यांच्यासह स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवले असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश…
