⚡कणकवली ता.२८-: सचिन राऊळ व त्यांचा मित्र महेश गुरव हे आपल्या ताब्यातील व्हॅगनार कार भरणी ते माईण अशी घेऊन जात असताना सोमरून भरधाव येणाऱ्या दुचाकीची कारला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार विद्या आचरेकर या जखमी झाल्या. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात रविवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास माईण-हातणकरवाडी याठिकाणी घडला. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विद्या आचरेकर यांच्याविरोधात सचिन राऊळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन राऊळ व त्यांचा मित्र महेश गुरव हे आपल्या ताब्यातील व्हॅगनार (एम. एच. ०७ ए.जी.७८३४ ) घेऊन माईण येथील त्यांचा मित्र श्रीकृष्ण घाडीगावकर यांना भेटण्यास जात होते. माईण, हातणकरवाडी येथे ते आले असता समोरून भरधाव वेगाने ऍक्टिव्हा (क्रमांक एम.एच ०७ ए.एन. ६३५७)घेऊन विद्या आचरेकर या येत होत्या. त्यांनी राॅग साईडने व्हॅगरला जोरदार धडक दिली. या अपघातात विद्या या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सचिन सत्यवान राऊळ (४७, रा. भरणी,तांबळवाडी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी विद्या आचरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल…
