कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने रविवारी कणकवली पोलिसांनी कणकवली शहर व फोंडा बाजारपेठ येथे संचलन केले. यामध्ये ५ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अंमलदार, सीमा सुरक्षा बल, होमगार्ड यांचा समावेश होता.
कणकवली पोलीस ठाणे हद्दीत कणकवली बाजारपेठमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी.स्टँड, आप्पासाहेब पटवर्धन चौक यामार्गावर संचलन केले. फोंडाघाट बाजारपेठत संचलन केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे.
कणकवली शहर, फोंडाघाट बाजारपेठेत पोलिसांचे संचलन…
