Headlines

उज्वला गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡सावंतवाडी ता.२८-: उज्वला उमाकांत गावडे वय ६६ बिरोडकर टेंब सावंतवाडी,हिचे आज राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.तिच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,नातवंडे,जावा,पुतणे,पुतणी,असा मोठा परिवार आहे,सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांच्या त्या वहिनी तर पाणीपुरवठा खात्यातील कंत्राटी कामगार संदिप गावडे यांच्या त्या मातोश्री होत.

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयात हिवताप दिनानिमित्त जनजागृती…

⚡मालवण ता.२८-:महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्टीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक हिवताप दिन कार्यक्रमाचे मालवण ग्रामीण रुग्णालयात आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त जागतिक हिवताप दिनानिमित्त मालवण ग्रामीण रुगणालय येथे जनजागृतीपर आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहेंदळे, डॉ. अनिता गावकर, आरोग्य सहायक भीमसेन कोरडे,…

Read More

चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त 8 मे रोजी कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२८-: शहरातील कांबळे गल्ली येथील श्री चौंडेश्‍वरी मंदिराचा 21 वा वर्धापन दिन बुधवार 8 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवली यांच्यावतीने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.सकाळी 8 वा. कलश दिंडी, 9 वा. नवचंडी होमहवन, पूजाविधी, दुपारी 12.30 वा. आरती, 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4.30 वा. दिंडोरी…

Read More

श्रावण येथील सेनेचे कार्यकर्ते स्वगृही परतले…

⚡कणकवली ता.२८-: दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड हे पुन्हा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विजय भवन येथे स्वगृही परतले. यावेळी दुलाजी परब, स्वप्नील दळवी, अभिजित पवार, ओंकार लाड आदी उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपमांचायत निवडणुकीत श्रावण येथील प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड यांना भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी श्रावण…

Read More

ओटवणेच्या प्रज्वलची नौदलात निवड…

गावातील देशसेवा बजावत असलेल्या युवकांचा घेतला आदर्श ⚡सावंतवाडी ता.२८-: आपल्याच वाडीतील यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेऊन त्यादृष्टीने स्वप्नपूर्तीला जिद्द आणि प्रयत्नाची जोड दिल्यास कोणतेही लक्ष गाठणे कठीण नाही हे ओटवणे येथील प्रज्वल पुनाजी पनासे या युवकाने दाखवून दिले आहे. देशसेवा बजावत असलेल्या आपल्या वाडीतील चौघांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण केल्याने या अवघ्या २० वर्षीय युवकाची…

Read More

भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी…

नितीन बानगुडे पाटील : देवगड येथे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा.. ⚡देवगड ता.२८-: लोकसभा निवडणूक ही देशाच्या आणि जनतेच्या तसेच भावी पिढीच्या भवितव्याची निवडणूक असून गद्दार विरुद्ध निष्ठावंत हुकूमशाही विरुद्ध लोकशाही भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक असून या देशाच्या भवितव्यासाठी या निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे…

Read More

*सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत…

⚡सावंतवाडी ता.२८-: लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष राजू बेग यांचा नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी बाहेरचावाडा येथे मुस्लीम बांधवांची सभा संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अर्षद बेग व राष्ट्रवादी…

Read More

राणेंच्या प्रचाराचा कळसुलीत शुभारंभ…

⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कळसुली विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव भोगनाथ मंदिर येथे करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कळसुली सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच गजानन मठकर, माजी सरपंच अतुल दळवी, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भरत घाडीगावकर, कळसुली…

Read More

…म्हणून अमित शहांनी आपली सभा रद्द केली

खा. विनायक राऊत:मी गत निवडणुकीतील घेतलेल्या लीडपेक्षा यंदा जास्त लीड घेऊन निवडून येणार.. ⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा पराभव होणार असल्याचे केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांनी 24 एप्रिलची आपली जाहीर सभा रद्द केली, असा गंभीर आरोप मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंडिया…

Read More

राणेंना शहरातून लीड मिळवून देणार…

समीर नलावडे यांची माहिती ः भाजपकडून शहरात राणेंच्या प्रचाराचा धडका.. ⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना कणकवली शहरातून मोठे मताधिक्य देणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. शहरात राणेंचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. शहर भाजपतर्फे शनिवारी शहरात राणेंच्या प्रचारार्थ रॅली काढली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून राणेंना मतदान…

Read More
You cannot copy content of this page