श्रावण येथील सेनेचे कार्यकर्ते स्वगृही परतले…

⚡कणकवली ता.२८-: दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड हे पुन्हा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विजय भवन येथे स्वगृही परतले. यावेळी दुलाजी परब, स्वप्नील दळवी, अभिजित पवार, ओंकार लाड आदी उपस्थित होते.


दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपमांचायत निवडणुकीत श्रावण येथील प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड यांना भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी श्रावण येथे सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला दोन वर्षे पूर्ण झाली तरी देखील भाजपकडून सभामंडप पूर्ण झाला नाही. भाजपला आश्वासनांचा विसर पडला. या कार्यकत्यांनी भाजप नेत्यांकडे अनेकवेळा याबाबत पाठपुरावा देखील केला. मात्र, भाजपने याकडे दुर्लक्ष आले. भाजपची ही फसवेगिरी या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी नाईक यांची भेट घेत आपली कैफियत मांडून दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

You cannot copy content of this page