चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त 8 मे रोजी कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२८-: शहरातील कांबळे गल्ली येथील श्री चौंडेश्‍वरी मंदिराचा 21 वा वर्धापन दिन बुधवार 8 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ, कणकवली यांच्यावतीने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
सकाळी 8 वा. कलश दिंडी, 9 वा. नवचंडी होमहवन, पूजाविधी, दुपारी 12.30 वा. आरती, 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4.30 वा. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कणकवलीतर्फे दुर्गा सप्तश्रृंगीपाठ होईल. तरी या कार्यक्रमांचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोष्टी समाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page