मालवण ग्रामीण रुग्णालयात हिवताप दिनानिमित्त जनजागृती…

⚡मालवण ता.२८-:
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्टीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक हिवताप दिन कार्यक्रमाचे मालवण ग्रामीण रुग्णालयात आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त जागतिक हिवताप दिनानिमित्त मालवण ग्रामीण रुगणालय येथे जनजागृतीपर आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहेंदळे, डॉ. अनिता गावकर, आरोग्य सहायक भीमसेन कोरडे, सावंत, सुधीर चांदोस्कर, साखरे यांनी कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जगजागृतीपर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मालवण ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page