रानबांबुळी अणावकरवाडी रेल्वे ब्रीजजवळ ट्रेनची धडक बसल्याने वृध्द महिलेचा मृत्यू…

ओळख पटविण्यासाठी नागरिकांना आवाहन. ओरोस ता.०६-:रानबांबुळी अणावकरवाडी रेल्वे ब्रिजवर मालगाडी रेल्वेस पायी क्रॉस करताना धडकेत एक अनोळखी महिला वय अंदाजे 65 ते 70 वर्षे डोक्यास गंभीर दुखापत होऊन मयत झाली आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. या महीलच्या दोन्ही हातांवर टॅटू गोंदवलेल्या आहेत. अंगामध्ये जांभळ्या रंगाची साडी आणि काळ्या रंगाचे ब्लाउज असून दोन्ही हातामध्ये…

Read More

गोव्याच्या सीमेवर सिंधुदुर्गातील गाड्या रोखल्या…

मालवण येथे अपघात करणाऱ्या चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ घेतली भूमिका:रात्री उशिरा पर्यंत सुरू होते पडसाद बांदा/प्रतिनिधीमालवण येथे काल डंपरने वृद्धाला चिरडल्याने संतप्त झालेल्या जमावाने गोव्यातील डंपर चालकाला मारहाण केल्याचे पडसाद काल रात्री गोव्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गोव्यातील डंपर व मच्छी व्यावसायिक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात येणाऱ्या व गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या सर्व गाड्या काल…

Read More

मिलाग्रीस हायस्कूलच्या अमूल्य घाडीची राष्ट्रीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड….

⚡सावंतवाडी ता.०६-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा २०२३-२४. या स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेचा विद्यार्थी कुमार अमूल्य अरुण घाडी( इयत्ता नववी) याने सहावा क्रमांक पटकावला असून त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्रशालेचे प्राचार्य फादर…

Read More

दुचाकीला ठोकरल्याने लादी कामगाराचा मृत्यू…

मालवण दि प्रतिनिधीकुंभारमाठ येथून भरधाव वेगाने मालवणच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकल स्वाराने समोरून आलेल्या अर्टिगा कारला दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोटारसायकल स्वार संजीवकुमार मोहनराय यादव (वय-२०) राहणार बिहार या लादी कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीच्या मागे बसलेला त्याचा सहकारी मुन्नीकुमार राम हा गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी मुन्नीकुमार याला मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून…

Read More

देऊळवाडा अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा…

काल रात्री विजय नाईक यांचा ठोकरल्याने झाला होता मृत्यू.. मालवण दि प्रतिनिधी मालवण देऊळवाडा येथे रविवारी रात्री डंपरने दिलेल्या धडकेमुळे मृत्यू झालेल्या मालवण देऊळवाडा येथील विजय वसंत नाईक याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मालवण पोलिसांनी रामू लवू नाईक (वय ३२) राहणार यादगीर कर्नाटक या डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

Read More

हडी येथे जनरेटर बंद करीत असताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू…

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील हडी येथील बर्फ फॅक्टरीत काम करताना जनरेटर बंद करण्यास गेलेल्या रोशन लाल (मूळ रा. उत्तरप्रदेश) या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडी येथील बर्फ फॅक्टरीत तिघे कामगार काम करीत असताना सकाळी साडे नऊ वाजण्याच्या…

Read More

सावंतवाडीत उद्यापासून “महासंस्कृती महोत्सव”…

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०५:- शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासंस्कृती महोत्सव’ राज्यभर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ऐतिहासिक सावंतवाडी शहरात ६ ते १० फेब्रुवारी पर्यंत ‘महासंस्कृती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या मंगळवारी महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी, बुधवारी…

Read More

नमो चषक तर्फे आयोजित तालूकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचे यश…

⚡सावंतवाडी ता.०५-: नमो चषक तर्फे आयोजित तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा रविवार दिनांक ४ . ०२ .२०२४ रोजी जिमखाना मैदानावर संपन्न झाल्या .या स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या इ . ९ तील कु . जिहान रिझवान मेमन याने उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक व इ . ८वी तील कु. फुदेल हसन आगा याने…

Read More

जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला मोठा प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीबांदेश्वर फिटनेस क्लब आयोजित व कोकणसिंधू पाॅवरलिफ्टींग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय पाॅवरलिफ्टींग स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भाजप बांदा शहर अध्यक्ष नरसिंह ऊर्फ…

Read More

आ भास्कर जाधव यांना शेवटची वार्निंग….

निलेश राणे: माझा पराभव झाला तरी चालेल पण योग्य बंदोबस्त केला जाईल.. ⚡ओरोस ता.०५-: राजकीय व्यासपीठावरून टीका करताना मर्यादेत राहून बोलायचे असते. परंतु व्यक्तिगत टीका अत्यंत खालच्या पातळीवर उतरून करणे योग्य नसते. परंतु काल कणकवली येथे टीका करताना आ भास्कर जाधव यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांना ही शेवटची वार्निंग आहे. यापुढे टीका केल्यास…

Read More
You cannot copy content of this page