राणेंचा जनाधार घटला;फडणवीसांनी याचा विचार करावा…

खा. विनायक राऊत यांचा टोला ः नांदगाव येथे मविआची सभा..

⚡कणकवली ता.२७-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी 13 यादाची वाट पाहवी लागली. यावरून राणेंचा भाजप व महायुतीत काय पात्रता आहे, हे जनतेला कळले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा जनाधार दिवसेंदिवस घटत चालला आहे, याचा विचार देवेंद्र फडवणीस यांनी करावा, असा मिश्किल टोला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी लगावला.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवारी कासार्डे व बीडवाडी विभागाच्या नांदगांव येथील सभेत श्री. राऊत बोलत होते. यावेळी पक्षाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,उ पनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, सेनेचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, रमजान बटवाले, माजी जि. प. सभापती नागेश मोर्ये, संदीप कदम, सचिन सावंत, बाबी देव, संजय जोशी, वैदही गुडेकर, संजना कोलते आदी उपस्थित होते.
राजापूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला राणेंनी लमाणी कामगारांना पैसे देऊन सभेला आणले होते. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंना जनाधार किती आहे, याच विचार देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असे राऊतांनी सांगितले. राणे यांचा बीपी मधल्या काळात वाढला होता त्याला जबाबदार कोण? असा टोला राऊत यांनी फडणवीस यांना लागवला. त्याचबरोबर नारायण राणे यांनी हल्लीच मोदी आणि अमित शाह यांच्यासह स्वतः फडणवीस यांचाही उदो उदो केला होता याची आठवण राऊत यांनी करून दिली.
श्री. राऊत यांनी वाढती महागाई, बेरोजगारी यासह डबल इंजिन सरकारच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक व गोरगरीब जनतेला नाडले जात आहे आणि त्यातून जो रोष निर्माण होतोय त्याला आळा घालण्यासाठी एनआरसीसारखे कायदे आणून अल्पसंख्यांक लोकांना आणि गरिबांना किंवा जे जे लोकं भाजप विरोधी आहेत त्यांना हद्दपार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. यावेळी विनायक राऊत यांचा मशाल देऊन सत्कार करण्यात आला. ‘उद्धव ठाकरे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आवाज कुणाला, शिवसेनेचा’, ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, ‘विनायक राऊत तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेनेचा विजय असो’, ‘मविआचा विजय असो’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. सभेला मविआचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page