⚡कणकवली ता.२७-: मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला इर्टिगा कारने मागाहून धडक दिली. यात चालक निखिल गुंड व देवा रेड्डीयार (दोघे रा. पुणे) हे जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा मार्गावरील साळिस्ते याठिकाणी शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातग्रस्तांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताबाबत कंटेनर चालक पांडुरंग आग्रे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत अधिक तपास चंद्रकांत झोरे करीत आहेत.
साळिस्ते येथील अपघातात दोघे जखमी…
