युवासेनेकडून दारिस्ते-बौद्धवाडीत टँकरद्वारे पाणीपुरवठा…

⚡कणकवली ता.२८-: तीव्र उन्हाळ्यामुळे दारिस्ते- बौद्धवाडी येथे पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई निर्माण झाली अाहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बौद्धवाडीत पिण्याच्या पाणाची टंचाई निर्माण झाल्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी स्वखर्चातून पाणीपुरवठा केला.


यावेळी दारिस्ते ग्रा. पं. सदस्य सदस्य सुधाकर जाधव, शिवसेनेचे शाखाप्रमुख अविनाश गावकर, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, संदीप गावकर आदी उपस्थित होते. बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर केल्याबद्दल लोके यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

You cannot copy content of this page