भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा सल्ला..
कणकवली ः आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा पराभव होणार असून तो सुशांत नाईक यांना दिसू लागला आहे. नाईक यांचा उरला सुरला उबाठा शिवसेना पक्ष आमदार नीतेश राणे यांनी रोज पक्षप्रवेश घेऊन संपवला आहे. त्यामुळे सुशांत नाईक यांनी विनाकारण बडबड करून प्रसिद्धी करून घेऊ नये. असा सल्ला भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिला.
आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेले वातावरण पाहून नाईक कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आतापर्यंत दहशतवाद या नावाने डंका पिटून मते मिळवायची हीच रणनीती आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ – मालवण मतदारसंघामध्ये वापरली. पण, या लोकसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्हा उभा राहीला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पराभूत होणार्या उमेदवाराच्या पदाधिकार्यांनी उगाच आव्हानाची भाषा करू नये. नगरपंााायतीाो बजेट समजत नाहीत ते देखील राणेंच्या खात्यावर बोलतात हे हास्यास्पद असल्याचेही कोदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
