रेल्वे फाटक बंद; दोन्ही बाजूने लागल्या वाहनांचा रांगा…

हळवल येथील रेल्वे फाटकाजवळील प्रकार..

कणकवली ः सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हवळल येथील रेल्वे फाटक उघडणे शक्य झाले नाही. पाऊण तास फाटक बंद राहिल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
कोकण रेल्वे मार्गाने तेजस एक्सप्रेस निघून गेली. मात्र, फाटक उघडण्याबाबत रेल्वे स्टेशनकडून काहीच सिग्नल न मिळाल्याने गेटमनने फाटक उघडले नव्हते. मात्र, दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी फाटकाजवळ आले होते. पुढे सिग्नल बिघाड दूर झाला नव्हता तरीही फाटक उघडण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूने थांबलेली वाहने मार्गस्थ झाली.

You cannot copy content of this page