⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा कलमठ बाजारपेठेत शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी शनिवारी घरोघरी प्रचार करण्यात आला.
कलमठ विभागाचे प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा धीरज मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, वैदेही गुडेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, वैदही हजारे, विलास गुडेकर, किरण हुन्नरे, प्रवीण कोरगावकर, पप्पू कोरगावकर, बाबू कोरगावकर, बचू कांबळे, नंदकिशोर कोरगावकर, इम्तियाज शेख, संदीप कांबळी आदी सहभागी झाले होते.
