⚡कणकवली ता.२९-: मटण भाकरीचा प्रसादसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यात प्रसिद्ध असणार्या व भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार 5 मे रोजी पार पडणार आहे. यानिमित्त सकाळी 8 वा. पूजाविधी, 9 वा. नवस फेडणे, 12 वा. नवस बोलणे, सायंकाळी 4 वा. महाप्रसाद म्हणून चक्क मटण व भाकरीचा प्रसाद वाटप केला जातो. महाराष्ट्रातील मटण भाकरीचा प्रसाद मिळणारी अशी ओळख असणार्या या जत्रोत्सवाची तयारी सुरु आहे. जत्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगावाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.
कोळंबा देवाची 5 मे रोजी जत्रा…
