दिगवळेत 4 मे रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: कै. महादेव रावजी व गोविंद लुडबे परिवार चॅरिटेबल ट्रस्ट प्रज्ञापुरी दिगवळे-गावडेवाडी यांच्यावतीने नवीन बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार 4 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या सोहळ्यास बुरंबाळी-राधानगरी येथील सदानंदगिरी महाराज व कासार्डे येथील स्वामीकाका चंद्रकांत सावंत यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. शनिवार 4 रोजी सकाळी सूर्योदयावेळी आग्नहोत्र, 8 वा. गणेशपूजा व पादुका अभिषेक, 9 वा. मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत व दान दिलेल्या सर्वांचे सत्कार व आभार, 11 वा. चंद्रशेखर फर्नांडिस व नीलांबरी फर्नांडिस यांचे भक्तिभाव या विषयावर प्रवचन, दुपारी 12 वा. महाआरती, 1 वा. महाप्रसाद हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page