⚡कणकवली ता.२९-: मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दरवर्षी आशीवार्द पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात दिले जातात. या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2023 या 13 वर्षांत प्रकाशित झालेल्या पुरस्कांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व संबधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचायासह 30 मे पर्यंत पाठवाव्यात. पुरस्काराच्या विचारार्थ पाठवलेली पुस्तके कोणत्याही सबबीवर परत केली जात नाही व निवड समिताचा पुरस्कारांचा निर्णय अंतिम असणार आहे.
