Headlines

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची विल्हेवाट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची तत्परता

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गालगत पणदूर येथे सकाळी अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या साहाय्याने योग्य ती विल्हेवाट लावली.
मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. रस्त्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटलेली अंडी असल्याने घटनास्थळी दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन त्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत होती.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच संबंधित व्यावसायिकाला फोन करून सावंतवाडी येथून बोलावून घेतले. यावेळी महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी दिलीप बिल्डकॉन कंपनीचे उप अभियंता उपस्थित होते. दादा साईल यांच्या कार्यतत्परतेबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page