Headlines

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आनंदाचे हास्य

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते गणवेश वाटप

कणकवली : शहरातील कणकवली शाळा क्रमांक ५ येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. नव्या गणवेशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, जाई मुरकर, बाळू पारकर, निकित मुरकर, जय शेट्ये, मुख्याध्यापिका कल्पना माळये, अंगणवाडी सेविका स्वाती पोयेकर, सोनाली जाधव, गार्गी उबाळे, रसिका मिराशी, संदिक्षा शिवगण, केतकी दळवी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page