Headlines

डेगवेतील पडलेले पिंपळाचे झाड तात्काळ हटविले…

बांदा-दोडामार्ग मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत..

⚡बांदा ता.१४-:
बांदा दोडामार्ग मार्गावरील डेगवे बाजारवाडी येथे पिपळाचे झाड पडल्याने वाहतूक बंद होती. याबाबत भाजपा बांदा मंडळचे अध्यक्ष मधुकर देसाई यांनी आमसभेत प्रश्न मांडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तात्काळ बांधकाम विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ ते झाड हटविण्यात आले. मात्र या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
आज सकाळी बांदा दोडामार्ग मार्गावरील डेंगवे येथे जुनाट पिपंळाचे झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे त्या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली. अनेक वाहनधारकांची गैरसोय झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. आज सावंतवाडी येथे आमसभा चालू असताना तो मार्ग बंद झाला. याबाबत भाजपा बांदा मंडळचे अध्यक्ष मधुकर देसाई यांनी सदर बाब आमसभेत मांडली. याबाबत तात्काळ उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सूचना दिल्या त्यानंतर तात्काळ ते झाड हटविण्यात आले. झाड हटविण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली.

You cannot copy content of this page