Headlines

Global Maharashtra Breaking News

रिक्षेतील प्रवाशांनी रिक्षा चालकाला लुटले

शुक्रवारची घटना: पेढ्यातून दिले गुंगीचे औषध ओरोस ता.२७-: रिक्षेत भाडे म्हणून बसलेल्या परप्रांतीय जोडप्याने पेढा व पाण्यातून गुंगीचे औषध देवून दोन सोन्याच्या चैन व रोख २३ हजार रुपये लुटत रिक्षेची चावी घेवून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. तळगाव काटापुरवाडी येथील राजेश सावंत असे रिक्षा चालकाचे नाव असून त्याने आज याबाबत जबाब सिंधुदुर्गनगरी पोलिसांना…

Read More

युवा महोत्सवात सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे यश

⚡मालवण ता.२७-:कुडाळ येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चार विभागात यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धा- तृतीय क्रमांक- रीना जितेंद्र मराळ, तेजस संतोष कातवणकर, विजया राजन कांदळगावकर, मोरवेकर…

Read More

बीच क्लिनिंग मशीन मालवण नगरपालिकेत दाखल…

मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीपर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरात कचऱ्याची समस्या वाढत असून समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याचे वाढते प्रमाण हा गंभीर विषय बनला असल्याने मालवण नगरपरिषदेकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी करून उपलब्ध केलेली बीच क्लिनिंग मशीन आज मालवण नगरपालिका आवारात दाखल झाली. सुमारे दीड कोटी रुपयांची ही मशीन असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा…

Read More

कलमठ बिडयेवाडी येथील नदीवर पूल बांधण्यात यावा

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची ना. चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.२७-: कलमठ गावामधून जानवली नदी जात असल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत. गावातील ग्रामदैवत श्री कलेश्वर मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतर महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ग्रामस्थांना कणकवली शहरामध्ये येऊन वळसा घेऊन जावे लागते. गावाची लोकसंख्या सुमारे १२००० च्या आसपास आहे. त्यामुळे कलमठ बिडयेवाडी गावडेवादी येथील…

Read More

वागदे येथील महामार्गाच्या दुसऱ्या लेनचे काम सुरू

वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी केल्या सूचना ⚡कणकवली ता.२७-:वागदे येथील हळवल फाटा येथे काल झालेल्या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या बंद असलेल्या लेनचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ठेकेदार दिलीप बिल्डकॉनला बंद असलेली लेन सुरु करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज महामार्गाची बंद असलेली लेन सुरु करण्यासाठी दिलीप…

Read More

आम. वैभव नाईक यांनी मंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांची भेट

महामार्ग च्या वागदे तील अपघातग्रस्त ठिकाणी केली पाहणी ⚡कणकवली ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम. रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतर कणकवलीमध्ये महामार्गावर वागदे येथे अपघात झालेल्या ठिकाणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी देखील रवींद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. महामार्गाच्या संदर्भात प्रश्न मांडत असतानाच आतापर्यंत महामार्गावर अपघात होऊन मृत्यू झालेल्या…

Read More

शिवसेनेचे बुधवळे – कुडोपी सरपंच तुषार पाटणकर भाजपात दाखल

⚡कणकवली ता.२७-:मालवण तालुक्यातील आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पाटणकर यांनी आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर उपस्थित होते. बुधवळे कुडोपी येथील सुप्रिया मगम, रमेश पाटणकर, वासुदेव पाटणकर, रामजी पाटणकर, मोहन वाळवे, संतोष अपराज, विलास पाटणकर, संतोष वाळवे,उत्तम वाळवे,…

Read More

शिवसेनेचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी घेतली रवींद्र चव्हाण यांची भेट

⚡कणकवली ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताच कणकवली विश्रामगृहावर बांधकाम मंत्र्यांची शिवसेनेचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या.मात्र याबाबत रुपेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता रवींद्र चव्हाण यांच्याशी माझे अत्यंत जवळचे पूर्वीपासून संबंध असून, रवींद्र चव्हाण हे मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग…

Read More

कणकवलीत शिवसेना शिंदे गटाने नाम. रवींद्र चव्हाण यांचे केले स्वागत

⚡कणकवली ता.२७-: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाम. रवींद्र चव्हाण यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांच्या हस्ते शाल व परमपूज्य भालचंद्र महाराज यांची प्रतिमा देऊन रवींद्र चव्हाण…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कणकवली पटवर्धन चौक येथे जंगी स्वागत

गोट्या सावंत व समीर नलावडे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.२७-: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्याकरता सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांचे कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत व कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी जगी स्वागत केले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत,…

Read More
You cannot copy content of this page