Headlines

सावंतवाडीत भाजपची उद्या जिल्हा कार्यकारिणी बैठक…

⚡सावंतवाडी,ता.. ८-: भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच विविध स्तरांवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचे ‘सहर्ष स्वागत’ करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करणे, आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांबाबत चर्चा करणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page