Headlines

तळेरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

१२३ नागरिकांनी घेतला लाभ:महिला व्यापारी संघटना आणि ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचा संयुक्त उपक्रम..

⚡कणकवली ता.२८-: महिला व्यापारी संघटना, तळेरे आणि ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे बाजारपेठेतील कल्याणकर कॉम्प्लेक्स येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १२३ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष दीपक भोगले, व्यापारी महासंघाचे कार्यवाह चंद्रकांत (राजू) जठार, ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आर. सावंत, तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर डंबे, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, प्रविण वरुणकर, पंढरीनाथ महाडिक आणि महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा संपदा सुयोग महाडिक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, दृष्टीक्षमता तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच चष्म्यांचे योग्य दरात वितरण करण्यात आले. नेत्रचिकित्सक सचिन हरमलकर, ऑप्टिकल टेक्निशियन अनिकेत शिंदे आणि विष्णू तेंडुलकर यांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.

महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा संपदा सुयोग महाडिक म्हणाल्या की, निरोगी दृष्टी आणि निरोगी जीवन यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या सामाजिक जाणीवेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. १२३ नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याचे समाधान आहे. सर्व मान्यवर, ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनची टीम, वैद्यकीय सहकारी आणि संघटनेच्या महिला सदस्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. भविष्यातही महिला सक्षमीकरणासोबतच आरोग्य आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्षा रोशनी पिसे, रेश्मा तळेकर, सचिव श्रावणी मदभावे, सहसचिव साक्षी सुर्वे, रुचा पावसकर, पद्मा कांबळे, विशाखा पावसकर, पूर्वा खरावकर, वैष्णवी कल्याणकर, जिया कल्याणकर, श्रेया कल्याणकर, राधिका खरावकर आणि सायली डंबे यांच्यासह अन्य महिला सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आर. सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमसह सर्व मान्यवर, सहकारी सदस्य व नागरिकांचे अध्यक्षा संपदा महाडिक यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page