Headlines

बांदा मंडलातील ७७ बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रम १०० टक्के यशस्वी

सिद्धेश महाजन यांच्याकडून बूथ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन; एकजुटीचे केले कौतुक

बांदा/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय संवाद कार्यक्रमाचा १३९ वा भाग रविवार, २५ ऑक्टोबर रोजी बांदा मंडलातील सर्व ७७ बूथवर १०० टक्के यशस्वीरीत्या संपन्न झाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बांदा मंडलाचे ‘मन की बात’ प्रमुख तथा मंडल अध्यक्ष सिद्धेश महाजन यांनी सर्व बूथ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यक्रमाशी जोडलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून मनःपूर्वक आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्य, सामाजिक उपक्रम आणि देशाच्या प्रगतीशी संबंधित विषय नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात. या कार्यक्रमाचे बांदा मंडलातील सर्व ७७ बूथवर यशस्वी आयोजन होणे, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे, नियोजनाचे आणि पक्षकार्याप्रती असलेल्या समर्पित भावनेचे प्रतीक असल्याचे सिद्धेश महाजन यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बूथ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. सर्वांच्या एकजुटीने आणि अथक परिश्रमांमुळे हे यश साध्य झाले असून, यापुढेही अशीच संघभावना, समन्वय आणि पक्षकार्याप्रती निष्ठा कायम राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page