Headlines

कणकवली तालुका प्रवासी संघाकडून गणेशभक्त प्रवाशांचे ११ सप्टेंबरला स्वागत कार्यक्रम

कणकवली : गणेशोत्सवानिमित्त कोकणात मोठ्या संख्येने येणाºया गणेशभक्त प्रवाशांचे कणकवली तालुका प्रवासी संघाच्या वतीने स्वागत कार्यक्रम ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता पटवर्धन चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. एसटी बस, रेल्वे तसेच खासगी बसमधून कोकणात येणाºया प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी प्रवासी संघाकडून चालक व प्रवासी यांना पत्रके वाटुन जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहीती अध्यक्ष सखाराम सपकाळ यांनी दिली.
बस चालकांना महामार्गावरील वळणे, खड्डे, निसरडे रस्ते तसेच चढ-उतार लक्षात घेऊन चालकांनी वाहन सावधपणे चालवावे. सुरक्षित अंतर ठेवूनच पुढील वाहनाला ओव्हरटेक करावे. प्रवाशांच्या जिविताची संपूर्ण जबाबदारी लक्षात घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रवासात चढ-उतार करताना काही क्षणांचा अवधी असतो, त्यामुळे घाई न करता सुरक्षितपणे प्रवास करण्याचे आवाहन प्रवासी संघाकडून करण्यात आले आहे.
यावेळी उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सुभाष राणे, प्रा. हरिभाऊ भिसे, सुगंधा देवरुखकर, सल्लागार अशोक करंबेळकर, श्रद्धा कदम, पुजा सावंत,विलास चव्हाण उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page